। कर्जत । प्रतिनिधी ।
भारतीय जनता पार्टी कर्जत विधानसभा, युवक प्रतिष्ठान आणि संकल्प सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रास्त दरात श्रवण यंत्र वाटप शिबीर आयोजित केले होते. याप्रसंगी 64 लोकांना पाचशे रुपयांमध्ये यंत्र देण्यात आली. इतर रुग्णांची तपासणी करून पुढील उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगण्यात आले.
या शिबिरास कर्जतमधील लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करून आम्हाला अत्यल्प दरात श्रवण यंत्र मिळाल्याबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी मुंबई महापालिकेचे नगरसेवक निल सोमय्या आवर्जून उपस्थित होते. त्यांनी ‘ऐका स्वाभिमानाने’ या मोहिमेंतर्गत होणार्या या उपक्रमबाबत माहिती दिली.
ही श्रवण यंत्रे साधारणपणे बाजारात 9 ते 10 हजाराला मिळतात; परंतु युवक प्रतिष्ठानने ही मशिन्स परदेशातून खास त्यांच्यासाठी बनवून घेतली आहेत, असे सांगितले. या यंत्राचे 500 रुपये का घेतो, तेसुद्धा सांगितले. याच पैशातून अजून अनेकांना ऐकू येऊ शकते, त्यात आपला खारीचा वाटा असावा, यापुढेही कर्जतमध्ये विविध उपक्रम राबाविण्यासाठी मदत करू, असे सांगितले. तसेच सुनील गोगटे आणि त्यांच्या सर्व सहकारी भाजप पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सुनील गोगटे, वसंत भोईर, दिनेश सोलंकी, बळवंत घुमरे, मिलिंद खंडागळे, समीर सोहोनी, मारुती जगताप, नितीन कंदळगावकर, सूर्यकांत गुप्ता, प्रमोद पाटील, श्रीनिवास राव, दिनेश गणेगा, राहुल मसणे, सर्वेश गोगटे, हरिश्चंद्र मांडे, विजय कुलकर्णी, सार्थक घरलुटे, अभिनय खांगटे, दर्पण घारे, कल्पना दास्ताने, स्नेहा गोगटे, नम्रता कंदळगावकर, अश्विनी अत्रे, सुमीता, महर्षी, मानसी खेडेकर, स्वप्ना सोहोनी, भाऊ राठोड, रमेश राठोड आदी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.