• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

सुन्न करणारा प्रसंग

Varsha Mehata by Varsha Mehata
August 8, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नवी दिल्लीतील निर्भया अत्याचार प्रकरण दहा वर्षांपूर्वी घडले. नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या या मुलीवरील अत्याचारामुळे दिल्लीच नव्हे तर पूर्ण देशात मोठा क्षोभ उसळला. त्यानंतर बलात्कार्‍यांना फाशी देणारा कायदा झाला. महिला पोलीस स्टेशनसारखे उपक्रम झाले. पण महिलांवरचे अत्याचार काही थांबले नाहीत. गेल्या आठवड्यात, महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या भंडारा जिल्ह्यात एका महिलेवर झालेल्या बलात्काराचे प्रकरण ही याच मालिकेतील आणखी एक सुन्न करणारी घटना आहे. घरात भांडण झालं म्हणून रागारागाने माहेरी जाण्यासाठी निघालेल्या या महिलेच्या असहाय्यतेचा फायदा अनेकांनी घेतला. तिला मदत करण्याचा बहाणा करून तिची क्रूर फसवणूक केली. आरंभीच्या बातम्यांनुसार पोलिसांनी पुरेशी काळजी घेतली असती तर या महिलेचे नष्टचर्य कमी झाले असते. पण ते घडले नाही. आता ती नागपूरच्या इस्पितळात अतिशय गंभीर स्थितीत दाखल आहे. पुरोगामी म्हणवणार्‍या राज्यामध्ये एका महिलेला इतक्या भीषण प्रकाराला सामोरे जावे लागते हे वाचून कोणाही विचारी माणसाची मान शरमेने खाली जाईल. महिलांच्या सुरक्षिततेबाबत इतर प्रांतांपेक्षा महाराष्ट्रात स्थिती बरी आहे असा आपला समज असतो. पण अशा प्रकरणांमुळे वस्तुस्थिती समोर येते. भंडार्‍यातील महामार्गावर असलेल्या सुनसानपणामुळे हा प्रकार घडू शकला असे म्हणणार्‍यांना मुंबईतील शक्ती मिलमधील अत्याचाराची आठवण करून द्यायला हवी. महालक्ष्मीसारख्या गजबजलेल्या परिसरात ही बंद पडलेली मिल आहे. तिथे आपल्या पत्रकार मित्रासह कामासाठी गेलेल्या पीडितेला भयंकर अनुभवायाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे मुंबई असो वा भंडारा महिलांना कायम भिऊन राहावे लागेल अशीच ही स्थिती आहे. राज्य सरकारने या संदर्भात शक्ती कायदा केला. पण त्याला केंद्राने बराच काळ मान्यताच दिली नसल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या होत्या. अर्थात हा केवळ कायद्याचा प्रश्‍न नाही हेही तितकेच खरे. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी त्यांचे व्यापक प्रशिक्षण घडणे हे अधिक आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांना पुरुषांइतक्याच सहजतेने वावरता येईल असे वातावरण तयार केले जायला हवे. कायद्यामध्ये अत्याचार करणार्‍यांना फाशी देण्याची तरतूद केली गेली तरी समाजातले वातावरण बदललेले नसल्याने हे खटले ताकदीने उभे राहत नाहीत वा लढवले जात नाहीत असा सामाजिक कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये असे खटलेदेखील भराभर निकाली न निघता इतरांप्रमाणेच रेंगाळत राहतात. तितका काळ त्या संबंधित अत्याचारित महिलेला वारंवार अप्रत्यक्षरीत्या त्या अनुभवाला सामोरे जावे लागते. या दरम्यान, पोलीस, वकील व न्याययंत्रणेतील लोकांची वागणूक सहानुभूतीची असतेच असे नव्हे. शिवाय, निर्भया किंवा शक्ती मिलसारखी जी प्रकरणे गाजतात त्याकडे मिडियाचे थोडेफार लक्ष राहते. इतर प्रकरणांमध्ये असा दबाव नसल्याने व त्याची प्रसिद्धीही होत नसल्याने पोलीस बेपर्वा होण्याची शक्यता वाढते. या संदर्भात पोलीस, वकील व न्याययंत्रणेतील लोकांची संवेदनशीलता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. दुसरे म्हणजे गुन्हेगारांना जरब बसवणारी शिक्षा होण्यासाठी मुळात पोलिसांनी खटला नीट उभा करावा लागतो. अनेकदा यात साक्षीपुरावे नसतात. परिस्थितीजन्य पुराव्यावर विश्‍वास ठेवावा लागतो. महिलेच्या जबाबाला अधिक महत्व द्यावे लागते. भंडार्‍यातील प्रकरणातही हेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी व नंतर न्याययंत्रणेने याबाबत सतर्कता दाखवावी अशी अपेक्षा राहील. भंडार्‍याच्या घटनेने एकट्या व बेसहारा महिलांसाठी एक कार्यक्षम अशी हेल्पलाईन राज्यभरात सुरु करण्याची पुन्हा एकदा गरज अधोरेखित झाली आहे. ही हेल्पलाईन चोवीस तास उपलब्ध असायला हवी व तिच्यावर आलेल्या कॉलवर पोलीस वा इतर यंत्रणा त्वरीत कार्यवाही करतील अशी व्यवस्था उभी राहायला हवी. आत्महत्येचे विचार येत असलेल्यांना सावरण्यासाठी अलिकडे काही हेल्पलाईन निर्माण झाल्या आहेत. त्यांचा चांगला उपयोग होतो. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रसंगात एकटं वाटणार्‍या महिलेला आधार देण्यासाठी अशा हेल्पलाईन प्रभावी ठरू शकतील. याच प्रकरणात अशी हेल्पलाईन असती तर ती महिला माहेरी जाण्यासाठी निघाल्याक्षणी तिची काळजी घ्यायला कोणीतरी उपलब्ध होऊ शकले असते. आता तरी हे व्हावे, जेणेकरून अशी घटना पुन्हा घडू नये.     

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

चोरीच्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी महिला पोलिसने मागितली 90 हजाराची लाच

Next Post

आधी श्रीमंतांच्या मोफतखोरीकडे पाहा

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post

आधी श्रीमंतांच्या मोफतखोरीकडे पाहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?