फ्लॅटला लागलेल्या आगीत मोठे नुकसान

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल जवळील नेरे येथील नीलकमल सोसायटीतील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागली. यात घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महालक्ष्मीनगर नीलकमल सोसायटीच्या सेक्टर 2, याठिकाणच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागल्याची घटना घडली. याबाबतची माहिती नवीन पनवेल अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी फ्लॅटला लागलेली आग अवघ्या काही वेळात विझवली. आग लागल्यानंतर घरातील कुटुंबीयांना ताबडतोब बाहेर काढण्यात आले. त्यामुळे यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Exit mobile version