• Login
Saturday, September 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कार्यालय पाण्यात, नागरिक संकटात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 19, 2026
in sliderhome, माणगाव, रायगड
0 0
0
कार्यालय पाण्यात, नागरिक संकटात
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जुन्या पंचायत समितीची इमारत बनली धोकादायक; कर्मचारी, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यातील विविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता कार्यालयासह तालुका सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यालय सध्या अक्षरशः पाण्याच्या विळख्यात सापडले आहे. जुन्या पंचायत समितीच्या आवारातील या इमारतीभोवती पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांना चिखल-पाण्यातून वाट काढत कार्यालयात जावे लागत आहे. वर्षानुवर्षे ही समस्या कायम असूनही संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनाचे त्याकडे गांभीर्याने लक्ष नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

जुन्या पंचायत समितीची ही इमारत आधीच जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे. त्यातच आवारात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रभावी व्यवस्था नसल्याने पाणी मोठ्या प्रमाणात तुंबते. अनेक दिवस पाणी साचून राहिल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी, अस्वच्छता आणि डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाचे कार्यालयच अशा अस्वच्छ आणि आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या वातावरणात सुरू असल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकालाही पाण्याने वेढले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही या स्मारक परिसरात पाणी साचलेले असताना ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाची अशी अवस्था असणे ही प्रशासनासाठी गंभीर बाब असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. या परिसरातील इतर शासकीय इमारतींची अवस्थाही चिंताजनक आहे. सर्व शिक्षा अभियानाची इमारत गळकी आणि धोकादायक झाली असून, वापराविना पडून असलेल्या इमारतींची देखभाल होत नसल्याने त्या हळूहळू भूतबंगल्याचे स्वरूप धारण करीत आहेत. शासनाच्या निधीतून उभारलेल्या या इमारतींचा योग्य वापर न झाल्याने लाखो-कोट्यवधी रुपयांची सार्वजनिक मालमत्ता अक्षरशः वाया जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

कार्यालय परिसरात अनधिकृतपणे उभी केली जाणारी वाहने, वाढलेली झाडे-झुडपे आणि अस्वच्छतेमुळे संपूर्ण परिसराचा बकालपणा वाढला आहे. उघड्यावरच मुतारीचा वापर होत असल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेत आणखी भर पडत आहे. शासकीय कार्यालयांच्या परिसराची अशी अवस्था असताना स्वच्छता आणि सुरक्षिततेचे नियम नेमके कोणासाठी, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. एका बाजूला नवीन आणि प्रशस्त शासकीय इमारती उभारल्या जात असताना दुसऱ्या बाजूला जुन्या इमारतींची देखभाल न झाल्याने त्या पडझडीच्या अवस्थेत जात आहेत. त्यामुळे शासनाचा मोठा निधी खर्च करून उभारलेल्या मालमत्तेचा प्रभावी वापर होत नसल्याचे चित्र आहे.

नियोजनाचा अभाव आणि संबंधित यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कार्यालय आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यालय नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित महत्त्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून ही कार्यालये तातडीने सुरक्षित, सुसज्ज आणि नवीन इमारतीत स्थलांतरित करावीत, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच जुन्या पंचायत समिती परिसरातील पाण्याचा कायमस्वरूपी निचरा, स्वच्छता, धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, अनधिकृत वाहनांवर कारवाई आणि परिसरातील झाडे-झुडपे हटवून स्वच्छता करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. कार्यालयेच जर पाण्यात आणि अस्वच्छतेच्या विळख्यात असतील, तर नागरिकांना स्वच्छता व आरोग्याचा संदेश कोण देणार? असा संतप्त सवाल माणगावकरांकडून उपस्थित केला जात असून, प्रशासनाने आता तरी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन ठोस कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtraMangaon Panchayat Samitimangaov newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial newsZilla Parishad Water Supply Department
Previous Post

गर्भवतीला झोळी, नेत्यांना ‘रिल्स’ची चिंता!

Next Post

उद्योगांची भरारी, स्थानिकांच्या हातात बेरोजगारी!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा
sliderhome

खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा

September 11, 2026
sliderhome

महामार्गावर ‌‘नो पार्किंग’; वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग!

September 11, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

कोकणकरांच्या सेवसाठी ‌‘लालपरी’

September 11, 2026
sliderhome

‌‘उसने‌’ कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडवेना!

September 11, 2026
sliderhome

एसी केबिन सोडा, ओपीडीमध्ये बसा! वरिष्ठ डॉक्टरांना आरोग्य विभागाचा थेट अल्टिमेटम

September 11, 2026
क्राईम

अल्पवयीन मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
Next Post

उद्योगांची भरारी, स्थानिकांच्या हातात बेरोजगारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?