पुण्यात पुन्हा पावसाचे थैमान

पुण्याला हवामान विभागाने रेड अलर्ट

| पुणे | प्रतिनिधी |

खडकवासल्यातून 35 हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगर भागात सोसायटींमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. सोसायटी मधील नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे.

लोणावळामध्ये सकल भागात पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले आहेत. वाकसई, कार्ला, मळवली, देवले परिसरात पाणीच पाणी झाले आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.

एकविरा आईच्या गडावर पावसाचा हाहाकार

धबधबे वाहू लागले, पुण्यासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पुण्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. लोणावळ्यात पावसाचे प्रमाण वाढले असून भुशी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून पावसाचे पाणी वेगाने वाहत असल्याने, लोणावळा पोलिसांनी सुरक्षेसाठी पर्यटकांना भुशी धरणावर जाण्यास मज्जाव केलाय त्यामुळे भुशी धरण परिसर निर्मनुष्य झाले असून, भुशी धरणाचे पांढरे शुभ्र पाणी वाहत असल्याचे चित्र भुशी धरणावर दिसून येत आहे.

Exit mobile version