पुढील दोन दिवस मुसळधार!

| मुंबई | प्रतिनिधी ।

पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण-गोवा विभागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस, तर घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वादळी हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Exit mobile version