राज्यात 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज

| मुंबई | प्रतिनिधी |

एकीकडे परतीच्या पावसाचे वारे वाहत असताना, दुसरीकडे हवामान विभागाने येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्य पूर्व अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे शनिवारी रात्री आणि रविवार 1 ऑक्टोबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. समुद्र खवळलेला असल्याने किनारपट्टी भागातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मागील तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीपासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर सुमारे 110 किमी खोल समुद्रात चक्रीवादळ होत आहे. त्याचा प्रभाव पश्चिम-पणजी ते रत्नागिरी दरम्यान जाणवणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. गोवापासून कोकण किनारपट्टीच्या दिनेशे हे चक्रीवादळ पुढे सरकत असल्याने त्याचा परिणाम मासेमारी आणि पर्यटन व्यवसायावर होत आहे. गोवा आणि कोकण किनारपट्टीवरील जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

दरम्यान, मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. नैऋत्य मोसमी परतण्यास सुरु झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. नैऋत्य मान्सून राजस्थानातून माघारी फिरत असल्याची घोषणा यापूर्वीच हवामान विभागाने केली होती. तसेच याआधीही हवामान विभागाने 29 सप्टेंबरपासून पूर्व भारतात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. तो आता दिसून येत आहे. नैऋत्य मान्सून सामान्यपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, त्यानंतर 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. साधारणपणे 17 सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत हा परतीचा प्रवास सुरु असतो.

Exit mobile version