कर्जत तालुक्यात पावसाचा जोर

अनेक छोट्या-मोठ्या पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद

। नेरळ । वार्ताहर ।

दोन दिवस सतत कोसळणार्‍या पावसाने कर्जत तालुक्यातील नद्यांना पूर आला असून या पुरात अनेक छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावातील वाहतुकीचा मार्ग बंद झाल्याचे पाहायला मिळाले, अनेक ठिकाणी भात लावणीची कामे सुरु असताना मोठा पूर झाल्याने शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

नेरळ, दहिवली, मोहिली, आवलंस अशा अनेक छोट्या मोठ्या पुलानवरून पाणी गेल्याने वाहतून पूर्णपणे बंद झाली होती. कर्जत शहरातील अनेक सोसायटीत मध्ये पाणी शिरले होते. तर मोहिली, बीड गावात देखील पाणी शिरल्याने अनेक नागरिकांची तारांबळ उडाली होती. पुराच्या पाण्यात अनेक जणांची कोंडी झाली, तर अनेक चाकरमान्यांचे नुकसान देखील झाले आहे. अनेक ठिकाणच्या पुलानवरून पाणी गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. परिणामी अनेक गावांचा यामुळे संपर्क तुटला होता, आज रविवार असल्याने शाळांना सुट्टी होती. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला थोडा दिला मिळाला. परंतु पुरामुळे शेती वाहून गेल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.

Exit mobile version