। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड शहरासह पंचक्रोशीभागात अनेक दिवस पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. गुरूवारी अचानक सकाळच्या सुमरास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळित झाले होते. परंतु, येथील शेतकरी मात्र सुखावला आहे.
सकाळी ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊसाने हजेरी लावल्याने शेकडोंच्या संख्येने खरेदी करण्याकरिता आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. काही भाजी-फळे विक्रेते तसेच हातगाडीवर व्यवसाय करणार्यांचे सामान भिजल्याने त्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतात पाणी जमल्याने पिवळे पडलेल्या राबांना पाणी मिळाल्याने शेतकर्यांनी राबांना खत मारण्यास सुरुवात केली आहे.