। माणगाव । प्रतिनिधी ।
हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट महाविद्यालयात महाड मधील व्यवस्थापन विभागाच्या मार्फत ‘इंटरप्रिनियरशिप ओएसिस- मार्वलस मेकर्स मार्केट’ यावर उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक संबंधी आवश्यक ज्ञान, कौशल्य, विविध संधी, मुलांना स्वतःचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता. प्रथमतः हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या मुख्य सल्लागार डॉ. संध्या कुलकर्णी व प्राचार्य सुदेश कदम यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमात जवळपास 15 विविध प्रकारचे स्टॉल्स विद्यार्थ्यांनी मांडले होते. यात खाद्यपदार्थ, फनी गेम्स, आर्ट अँड क्राफ्ट, आर्टिफिशियल ज्वेलरी यांचा समावेश होता.