| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईसह कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाची नोंद झाली. मात्र, अमावस्येच्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली होती. मागील दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने पुढील पाच दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून, नवरात्री उत्सवावर पावसाचे सावट राहणार आहे. या कालावधीत तरूणाई उत्सव साजरा करण्याच्या तयारीत असते. अशा काळात पाऊस पडला तर दांडिया खेळणे अशक्य होणार आहे. पावसाच्या कालावधीत शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






