। महाड । जुनेद तांबोळी ।
महाड तालुक्यात रात्रीपासून तुफान पाऊस पडतोय. या पावसाने सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून दृष्यातून या नदीने रौद्ररूप धारण केलेलं पाहायला मिळत आहे. शहरातील सुकट गल्लीत पाणी शिरलंय तर दुसरीकडे महाडकडून किल्ले रायगडकडे जाणाऱ्या दस्तुरी नाका या मार्गावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलीय. शहरातील सखल भागात पुराचे पाणी साचायला सुरवात झालीय. नगर पालिका प्रशासनाने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क रहाण्याचा इशारा दिला आहे.







