दमदार पावसाने ‘इथले’ पाणीसंकट टळले

विहिरी, कालवे, ओढे तुडुंब
पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार

पाताळगंगा | वार्ताहर |
गेले अनेक दिवस वरुणराजा सर्वांवर कृपादृष्टी करीत असल्याने बळीराजा जाणवू आहे. या धरतीवरती वास्तव्य करीत असलेल्या प्राणीमात्रांवर सुखाचे सावट निर्माण झाल्याने सर्वत्र ठिकाणी विहिरी, कालवे, ओढे पाण्याने भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

गेले अनेक दिवस पावसाचे आगमन होत असल्यामुळे धरतीवर एक प्रकरचे चैतन्य निर्माण झाले आहे. कित्येक दिवस धरती अंगारा उधळणारी आज जणू या धरतीने हिरवा शालू परिधान केली की काय, असा भास प्रत्येक पर्यटकाला जाणवू लागत आहे. पावसाच्या आगमनाने शेतकर्‍यांच्या पुन्हा एकदा आशा पल्लवीत झाल्यामुळे बळीराजाला जगण्याची नवी उमीद निर्माण करून दिली असल्यामुळे बळीराजा सुखावला.

पावसाच्या अगमनाने विविध ठिकाणी असलेले पाण्याचे स्त्रोत्र भरले असून, पिण्याच्या पाण्याचे संकट टळले आहे. ज्या विहिरीने तळ गाठले होते, त्या विहरी पाण्याने पूर्ण भरल्यामुळे गृहिणी समाधान व्यक्त करीत आहे. पाण्यासाठी जणू तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र, गेले अनेक दिवस पावसाचे आगमन मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

Exit mobile version