देवभूमीत निसर्गाचा हाहाकार; 46 जणांचा मृत्यू

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळी राज्यभर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये आत्तापर्यंत तब्बल 46 लोकांना आपले प्राण गमवाले लागले आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी ूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पूरस्थितीची माहिती दिली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 11 जण बेपत्ता आहेत. काही जण जखमी देखील जाले आहेत. एकूण मृतांचा आकडा 46 पर्यंत गेला आहे, असं ते म्हणाले. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पुन्हा सर्व सुरळीत व्हायला वेळ लागेल. रस्ते वाहून गेले आहेत, दरडी कोसळल्या आहेत, काही ठिकाणी नद्यांनी आपले मार्ग बदलले आहेत. गावांना फटका बसला आहे, पूल कोसळले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Exit mobile version