तामिळनाडूत मुसळधार पाऊस ; जनजीवन विस्कळीत

चेन्नई | वृत्तसंस्था |
तामिळनाडुमध्ये गेल्या चार दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. आजही चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपूरम आणि तिरुवनमलाईसह पाँडिचेरीच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सततच्या पावसाने तामिळनाडुत दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. कराईक्कल आणि नागपट्टिनममध्ये मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी कराईक्कलमध्ये 24 तासात 200 मीमी तर नागपट्टिनममध्ये जवळपास 150 मीमी पावसाची नोंद झाली. 11 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडुच्या किनारपट्टीवर मध्य आणि उत्तर भागात 200 मीमी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Exit mobile version