रायगडला ऑरेंज अर्लट; हवामान खात्याचा इशारा
| पुणे | प्रतिनिधी |
गेल्या आठवड्यापासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पावसाचा ‘हायअलर्ट’ दिला असून, येत्या 18 जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील जळगाव, रत्नागिरी येथे ‘रेड अलर्ट’, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातार्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच, मुंबई, ठाणे, पालघर, भागांत ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
दरम्यान, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, पुणे शहर पावसाच्या पाण्याने तुंबले. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात देखील पावसाने जोर पकडला आहे. कोकणातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.