जोरदार पावसाचा भात शेतीला फटका

| उरण । वार्ताहर ।
आठवडाभर तालुक्यात असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरीही चिंताग्रस्त झाला आहे. असून तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पोटरीला आलेल्या भात पिकांसाठी हा पाऊस हानिकारक ठरत असल्याने तो अति पावसामुळे कुजण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. यावर्षी उशिरा लागवड झालेली शेती आता कुठे बहरत असताना चिरनेर व परिसरातील शेतातील भात पिके पोटरीला आली असताना भात पिकांना या पावसाचा तडाखा बसत आहे. त्यामुळे पोटरीला आलेल्या भात पिकांमध्ये पावसाचे पाणी जाऊन पोटरीला आलेले भात पीक न भरता रिकामे राहण्याची शक्यता असल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

उरण परिसरात मागील काही दिवसांपासून वादळी वार्‍यासह कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत सुमारे 300 शेतकर्‍यांच्या 55 हेक्टर क्षेत्रातील भात शेतीचे नुकसान झाले आहे. शेतात जमा झालेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा वेळेत न झाल्यास येत्या काही दिवसात पिकण्याच्या तयारीत आलेली भात पिके ही कुजून नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तालुका कृषी अधिकारी ईश्‍वरचंद्र चौधरी यांनी सांगितले हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात असताना तयार होत अलेली भात पिके धोक्यात आली आहेत पोटरीला आलेल्या भात पिकांना हा पाऊस हानिकारक ठरत आहे पोटरीला आलेल्या भात पिकांमध्ये पावसाचे पाणी जाऊन पोटरीला आलेले भात पीक पोचट राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर फुल धरण्याच्या अवस्थेत असलेल्या या पिकांना पडणार्‍या पावसाचा तडाखा बसत आहे. त्यामुळे भात पिकावरील फुलोरा कोसळून पडत आहे त्यामुळे हाता तोंडाशी आलेले भात पीक वाया जाण्याची मोठी शक्यता आहे यासाठी शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत.

परिणामी तालुक्यातीलसर्व भागात असणारे शेतातील भात पीक असा पाऊस कोसळत राहिला तर आडवे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत. पीक शेतात बहरू लागल्यानंतर मात्र पुन्हा एकदा सरत्या पावसाने शेतात उभ्या असलेल्या पिकांना धोका निर्माण केला आहे. जोराच्या पावसाबरोबर वारा देखील असल्याने भाताचे पीक शेतात कोसळून पडेल याची भीती देखील शेतकर्‍यांना वाटत आहे. यंदा भाताचे पीक भरपूर होईल ही येथील छोट्या शेतकर्‍यांची आशा या कोसळणार्‍या पावसामुळे ती मावळू लागली आहे.

Exit mobile version