जिल्ह्यात दोन दिवस अतिवृष्टी

| अलिबाग | वार्ताहर|

जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस 16 व 17 सप्टेंबर 2023 रोजी आँरेंज अलर्ट दिला आहे. कुलाबा वेधशाळेने आगामी दोन दिवस रायगड जिल्ह्यासह विविध जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान, आगामी या दिवसांसाठी जिल्ह्यात आँरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी , असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. मध्यंतरी पावसाने बरसुन पुन्हा उघडपी दिली होती. आता पुन्हा अतिवृष्टीचा उशारा दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

Exit mobile version