माणगावात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुक्यात सोमवार, दि.4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी जोरदार वारा आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. सकाळपासून ऑक्टोबर महिन्याची हिट जाणवत होती. अंगाची गरमीने लाही लाही होऊन घामाच्या धारा वाहत होत्या. त्यानंतर दुपारी 3.30 वाजल्यापासून ढगाळ वातावरण तयार होऊन सायंकाळी चारच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. यादरम्यान वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. विजेचा कडकडाट जोरात असल्याने लोकांनी आपल्या घराची दारे बंद केली होती. पावसामुळे सायंकाळी वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

Exit mobile version