। उरण । प्रतिनिधी ।
द्रोणागिरी नोड परिसरातील जीडीएल या मालाची हाताळणी करणाऱ्या यार्ड परिसरात पार्क केलेल्या अवजड वाहनांना अचानक आग लागण्याची घटना शुक्रवारी (दि. 13) दुपारच्या सुमारास घडली आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. सदर आगीचे कारण निश्चित समजले नसून, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. दरम्यान लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट उसळले असून वाहन चालक भयभीत झाले आहेत. या आगीत तीन वाहने जळून गेल्याची माहिती समोर येत आहे. वाहनांना आगी लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वाहन चालविणाऱ्यानी खबरदारी घ्यावी अशा सूचनाही देण्यात येत आहेत.






