। पाली/गोमाशी । प्रतिनिधी ।
नांदगाव ग्रुप ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला होता. या पोटनिवडणुकीत सरपंच पदासाठी दोन उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. मात्र, रायगड जिल्हा चिटणीस शे.का.प नेते सुरेश खैरे यांच्या नेतृत्वाखाली एका उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्यामुळे बिनविरोध निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला. निवडणूक अधिकारी यांच्यावतीने ही निवडणूक अधिकृतपणे बिनविरोध जाहीर करण्यात आली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जालिंदर खैरे यांची नांदगाव ग्रामपंचायत सरपंच पदी बिनविरोध निवड झाली. त्याची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा चिटणीस शे.का.प सुरेश खैरे, संजीव ठकोरे, दत्ताराम शिंदे, प्रशांत खैरे, भिकुनाथ म्हसकर, अशोक खैरे, शांताराम लहाने, विलास कारगे, उमेदवार मंगल समाधान मराठे, सखाराम खैरे, बाळाजी सावंत, सुधीर सावंत, रूपेश भोईर, नरेश भोईर आदी नांदगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





