महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबीर

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात आदिवासी आणि दुर्गम भागात जलसंजीवनी प्रकल्प राबविणार्‍या युनायटेड वे या संस्थेकडून महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबीर घेण्यात आले. तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये युनायटेड वेकडून जलसंजीवनी अभियान राबविले जात आहे.

युनायटेड वे या संस्थेकडून स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून बचत गटांमार्फत रोजगारनिर्मिती आणि महिला सशक्तीकरणचा एक भाग म्हणून महिलांच्या शाश्‍वत विकासासाठी फक्त आर्थिक स्वावलंबत्व पुरते मर्यादित न राहता सर्वांगीण विकास करण्यासाठी त्या सर्व महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायतीमधील बांगारवाडी गावात हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. त्या शिबिरात 31 महिला बचत गटामधील महिलांची हिमोग्लोबिन तपासणी आणि महिलांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे प्रकल्प समन्वयक विवेक कोळी यांनी प्रकल्पाची माहिती दिली. तर प्राथमिक आरोग्य केंद्र खांडस येथील आरोग्य विभागाचे प्रतिनिधी भारती चिमटे यांनी महिलांच्या रक्ताचे नमुने तसेच शिबीर यशस्वी होण्यासाठी समूह सखी गायत्री ऐनकर आणि युनायटेड वेचे प्रमोद धाडवड यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version