। पॅरिस । वृत्तसंस्था ।
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एक वेगळाच इतिहास रविवारी (दि.4) लिहिला गेला. ग्रेट ब्रिटनचा नौकानयनपटू हेन्री फिल्डमॅन हा पुरुष व महिला क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. फिल्डमॅन हा ग्रेट ब्रिटनच्या महिला नौकानयन संघात म्हणजेच मार्गदर्शक म्हणून सहभागी झाला होता. ग्रेट ब्रिटनच्या महिला संघाने कांस्यपदक जिंकले. तीन वर्षांपूर्वी फिल्डमन याने पुरुष संघाकडून याच क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.2016च्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर जागतिक रोईंगमधील नियमांत काही बदल करण्यात आले होते. यामध्ये पुरुष किंवा महिला अशा कोणत्याही खेळाडूला परवानगी दिली. त्यामुळे 8 महिला स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी फिल्डमॅन ग्रेट ब्रिटनच्या रोइंग संघात दिसला होता.