वीरपत्नी, मातांचा सत्कार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जागतिक महिला दिनानिमित्त शहाबाज ज्येष्ठ नागरिक संघातर्फे वीरपत्नी व मातांचा सत्कार मंगळवारी (दि.12) करण्यात आला. यावेळी अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. शहाबाजच्या सरपंच केतकी तरे व डॉ. स्मिता सहस्त्रबुध्दे यांच्याप्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी मालती पाटील, धारिणी भगत, अर्चना पाटील, सुमती टेमकर, सविता टेमकर, सुरेखा पाटील, मयुरी पाटील, रेखा टेमकर, संध्या पाटील, अनघा पाटील, हेमा टेमकर, श्रीमती अंजना पाटील, रेश्मा पाटील, अस्मिता पाटील, कविता कोठेकर, नेत्रा जुईकर, सिंधू भगत, लता भगत कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, महिला विविध क्षेत्रात काम करत आहेत. वेगवेगळी उच्च पदे भूषवीत आहेत तसेच, रिक्षापासून ते विमानापर्यंतची वाहने ही चालवीत आहेत. हे सर्व करत असताना आपलं घर सांभाळणे, सर्वांची काळजीदेखील घेत असतात. परंतु, स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतात. सक्षम होणे म्हणजे केवळ आर्थिक स्वावलंबी होणे नाही तर महिलांमध्ये वैचारिक सक्षमता येणेही खूप गरजेचे आहे. स्त्रीनेच स्त्रीचा छळ करण्याऐवजी एकमेकींना सक्षम बनवण्यास पाठिंबा द्या, असा मोलाचा सल्ला डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी दिला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मो.स.पाटील, अनंत पाटील, रामचंद्र भगत, रवींद्र पाटील, मंगेश भगत, नयना भगत, लता भगत, उषा उदय पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सूत्रसंचालनाची शुभांगी पाटील यांनी केले.

Exit mobile version