| मुंबई | दिलीप जाधव |
महाराष्ट्रभर सत्ताधारी महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडीतील पक्षाच्या विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक करत धुवाँधार प्रचार संपलेल्या दिग्गजांचे नशीब बुधवारी (दि. 20) मतपेटीमध्ये बंद झाले आहे. या प्रक्रियेत मुंबई आणि उपनगरातल्या फोफावत चाललेल्या टॉवर संस्कृतीमुळे मतदानाचा टक्का कमी झालेला आहे. मुंबईमध्ये 49.07 टक्के, तर उपनगरात 59.56 टक्के मतदान झाले आहे. पोलीस आणि प्रशासनाने केलेल्या चोख कारवाईमुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
मुंबईतील हाय प्रोफाइल लढतींपैकी वरळी मतदारसंघ गणला जातो. यात शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नातू माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विरुद्ध काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा यांचे सुपुत्र शिवसेना शिंदे गटाचे राज्यसभेतील खासदार मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात काटे की टक्कर होणार आहे. इथे मनसेच्या मतविभागणीमुळे आदित्य ठाकरे यांना फायदा मिळेल, असे येथील स्थानिक जनतेचे मत आहे.
दादर-माहिम मतदारसंघात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवरणकर अशी तिरंगी लढत आहे. या ठिकाणी अमित ठाकरे यांना भाजपाने पाठिंबा दिला आहे. तर सदा सरवणकर हेही अमितकरिता माघार घेणार होते. मात्र, त्यांना राज ठाकरे यांनी भेट नाकारल्यामुळे ते निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. मात्र, दोन शिवसेनेच्या मतविभागणीमुळे अमित ठाकरे यांना फायदा मिळेल, अशी येथील लोकांची धारणा आहे.
मुंबादेवी हा मुस्लिमबहुल मतदारसंघ आहे. तसेच काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. इथून काँग्रेसचे अमीन पटेल हे सतत तीन वेळा निवडून आले आहेत. तर त्यांच्याविरुद्ध भाजपाच्या प्रवक्ता असलेल्या फैशन डिजायनर शायना एन.सी यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे पक्षात जाऊन उमेदवारी मिळवली. या मतदारसंघात भाजपचे माजी आमदार अतुल शाह इच्छुक होते. त्यांची नाराजीही त्यांनी बोलून दाखवली होती. एमआयएम आणि समाजवादी पक्षाने आपला उमेदवार न दिल्यामुळे मुस्लिम मतांची विभागणी अमीन पटेल यांच्या मानखुर्द-शिवाजी नगर हा मुंबईतला मुस्लिम बहुल मतदारसंघ इथून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आसिम आझमी यांच्यात लढत आहे. अबू आझमी 3 वेळा निवडून आले आहेत. नवाब मलिक हे मनी लॉन्डरिंग प्रकरणामुळे तब्बल 17 महिने तुरूंगात होते. सध्या ते सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनामुळे तुरूंगाबाहेर आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट )आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या खुनानंतर या मतदारसंघाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. झिसान बाबा सिद्दीकी हा त्यांचा मुलगा काँग्रेसचा विद्यमान आमदार, मात्र त्याने अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यांच्या समोर शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंचे चुलत बंधू वरुण सरदेसाई रिंगणात उतरले आहेत. ठाकरे यांचा मातोश्री बंगला याच मतदारसंघात येतो. यापूर्वी येथून शिवसेनेचे बाळा सावंत हे 2 वेळा निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी शिवसेनेमधून निवडून आल्या. त्यांनी पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांचा पराभव केला होता. अणुशक्ती नगर ह्या मुस्लिमबहुल मतदारसंघामधून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातर्फे निवडणूक लढवित आहे. तिच्या समोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहद अहमद आहेत. समाजवादी पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करुन त्यांनी उमेदवारी मिळवली आहे.
कुलाबा मतदारसंघात भाजपाचे स्थानिक उमेदवार आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने देवासी नावाचे उमेदवार दिले आहेत. येथील लोकांचे मत आहे की काँग्रेसने स्थानिक उमेदवार दिला असता तर नार्वेकर यांना निवडणुकीत जास्त काम करावे लागले असते. मात्र, नवीन चेहरा आल्यामुळे नार्वेकर यांना ही निवडणूक जड जाणार नाही.