| अलिबाग | प्रतिनिधी |
पनवेल-सायन महामार्गावर खारघर टोल नाक्याजवळी हायवे ब्रेक या हॉटेलला रविवारी (दि.11) मध्यरात्री भीषण आग लागली. या भीषण आगीत हॉटेलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याबाबतची माहिती मिळताच खारघर सिडको अग्निशमक दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविणं त्यांना शक्य झाले. मात्र यामध्ये हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.