हिमाचल प्रदेश निवडणूक: काँग्रेसची मोठी आघाडी, भाजपला धक्का

। हिमाचल प्रदेश । वृत्तसंस्था ।

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. राज्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती पडणार हे आज स्पष्ट होईल.

हिमाचल प्रदेश निवडणूक निकालात काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेस 40 जागांच्या आघाडीवर आहे. तर भाजप 25 जागांवर आहे. तर अपक्ष 3 जागांवर आहेत. हे सर्व आकडे पाहता कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. काँग्रेसने बहुमत मिळवलं आहे. मात्र घोडेबाजाराची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची फळी शिमलात दाखल झाली आहे. विजयी आमदारांना मोहालीच्या रॅडिसन हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे.

CM जयराम ठाकूर यांनी जिंकली सहाव्यांदा निवडणूक
बहुचर्चित हिमाचल निवडणुकीचा पहिला निकाल समोर आलाय. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सेराज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर 20 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Exit mobile version