वडके विद्यालयात हिंदी है हम कार्यक्रम

। रेवदंडा । प्रतिनिधी ।
नेहरु युवा केंद्र संघटन, रायगड-अलिबाग आणि ओएसिस बहुउद्देशीय समाजाभिमुख संस्था, रेवदंडा-अलिबाग-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने चोंढी येथील वडके विद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला, प्रतिक कोळी, कार्याध्यक्ष यज्ञेश पाटील, मुख्याध्यापक भरत दळवी, उपमुख्याध्यापक मधुकर बावीस्कर, पर्यवेक्षिका मीनाक्षी भारंबे, सांस्कृतिक समिती प्रमुख लक्ष्मी पाटील, ग्रुप ऑफ युथ मुव्हमेंटच्या सहसचिव तनुश्री सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

वृत्तचित्र वाचन, काव्य वाचन, प्रश्‍नमंजुषा आणि हिंदी संवाद या स्पर्धा दोन सत्रात संपन्न झाल्या. तर तृतीय सत्रात आयोजित निबंध तथा घेण्यात आल्या. अन्य स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तनुश्री सुतार, सूत्रसंचालन प्रशाळेचे अध्यापक निवृत्ती गर्दे तर आभार प्रदर्शन रेखा भोईर यांनी केले.

Exit mobile version