। मुंबई । वृत्तसंस्था ।
दहावी-बारावीचे विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकवल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता हिंदुस्तानी भाऊला मुंबई सत्र न्यायालयातून जामीन मंजूर केला आहे. दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थांना चिथावल्याबद्दल फाटक याला 1 रोजी अटक करण्यात आली होती.







