हिंगणघाट जळीतकांडः पीडितेच्या स्मृतीदिनीच आरोपीला शिक्षा सुनावण्याचा निर्णय

। वर्धा । वृत्तसंस्था ।
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आरोपी विकेश नगराळेला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. १०) कोर्टात सुनावणी असून विकेश नगराळेला शिक्षा जाहीर होण्याची शक्यता आहे. या घटनेला १० फेब्रुवारी रोजी दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पीडितेच्या स्मृतीदिनाच्या दिवशीच आरोपीला शिक्षा सुनावणार असल्याची दाट शक्यता आहे.


हिंगणघाटपासून १५ किलोमीटर अंतरावरील दरोडा येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेनंतर मोर्चे, आंदोलने करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कार्यालयीन कामकाजच्या केवळ १९ दिवसातच ४२६ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयातही या प्रकरणात एकूण ६४ सुनावण्या घेत २९ साक्षीदरांचे प्रत्यक्ष जबाब नोंदविण्यात आले. तसंच, न्यायालय आरोपीला काय शिक्षा सुनावणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version