नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन

। मुंबई । वृत्तसंस्था ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारांसाठी पंतप्रधान मोदी उपस्थित होते. त्यांनी हिराबेन यांच्या पार्थिवाला खांदा दिला, तसंच पार्थिवासोबत शववाहिनीतून स्मशानभूमीपर्यंत प्रवासही केला.

गांधीनगर इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील उपस्थित होते. देशभरातून विविध नेत्यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version