| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
निष्क्रिय बंडखोर आमदार महेंद्र दळवी दिलेला शब्द पाळत नसल्याने कार्यकर्त्यांचा भ्रमनीरस होत आहे. धेरंड येथील हिराचंद्र जगन्नाथ पाटील यांनी आपले कोणतेच काम झाले नसल्याने शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी देखील अनेक कार्यकर्त्यांनी आमदारांनी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने नाराजी व्यक्त करीत पक्षाला रामराम केला आहे.
आपल्या दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, मी हिराचंद्र जगन्नाथ पाटील रा. धेरंड, ता. अलिबाग. मी धेरंड गावातील आपल्या शिवसेना शिंदेगट या पक्षाचा कार्यकर्ता (मतदार) आहे. आज पर्यंत आपल्या कडून किंवा आपल्या पक्ष कार्यकर्ता पदाधारी कडून माझे कोणतेही एकही काम झाले नाही. किंवा आता होणार ही नाही. म्हणून मी दि. ०३ जानेवारी पासून आपला पक्ष शिवसेना शिंदेगट या पक्षाचा राजीनामा देत आहे.
राजीनामा सत्रामुळे शिंदे गटात खळबळ उडाली आहे.