हिरानंदानी फाऊंडेशन स्कूलने पटकावले विजेतेपद

टीसीएस आयोजित स्पर्धेत 28 शाळांमधील 126 संघांचा सहभाग

। चिरनेर । प्रतिनिधी ।

आधुनिक तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा संगम असलेल्या ‘टीसीएस इनक्विझिटिव्ह 2026’ या आंतरशालेय प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या मुंबई फेरीत ठाण्यातील हिरानंदानी फाऊंडेशन स्कूलने विजेतेपद पटकावले. रोशन कन्ना आणि विवान कुंदेतकर या विजेत्या जोडीने राष्ट्रीय उपांत्य फेरीत स्थान मिळवले.

टीसीएस आयोजित स्पर्धेत 28 शाळांमधील 126 संघांनी सहभाग घेतला. यंदा स्पर्धेत एआय आधारित रिअल टाइम विश्लेषणाचा समावेश करण्यात आला होता. प्रत्येक फेरीनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण उपलब्ध करून देण्यात आले. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (स्टेम) यांसह विविध विषयांवर आधारित प्रश्नांनी स्पर्धेची रंगत वाढवली.

यंदा 28व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या स्पर्धेच्या विभागीय फेऱ्या देशातील विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात येत आहेत. त्यानंतर राष्ट्रीय महाअंतिम फेरीत ‘टीसीएस इनक्विझिटिव्ह नॅशनल चॅम्पियन्स 2026’ हा किताब मिळवण्यासाठी विजेते संघ आमनेसामने येतील.

Exit mobile version