| रसायनी | प्रतिनिधी |
रायगड जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा अलिबाग येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडल्या. या स्पर्धेत हिरानंदानी ट्रस्ट स्कूलच्या 14 व 17 वर्षांखालील वयोगटातील मुलांनी शानदार कामगिरी करुन विजेतेपद पटकावले आहे. तसेच, या दोन्ही संघांनी दमदार कामगिरी करून मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे शिक्षक प्रणव लबडे यांच्या मार्गदर्शन लाभत आहे. विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. शाळेच्या प्राचार्या रूपा चौधरी यांनी खेळाडूंचे कौतुक केले.







