हिरेनकडून सायकल चालवून हुतात्म्यांना अभिवादन

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ गावातील 13 वर्षीय सायकल पटू हिरेन राम हिसाळके याने आज हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना अभिवादन करण्यासाठी राजगड ते नेरळ असा 130 किलोमीटर लांबीचा प्रवास केला. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी हिरेन ने 90 किलोमीटर सायकल चालवून अभिवादन केले होते.
देश पारतंत्र्यात असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी आग्रही असणा-या तरुणांची फळी उभारण्यात भाई कोतवाल यशस्वी झाले होते. या आझाद दस्त्याची ब्रिटिशांनी मोठी धास्ती घेतली होती. या संघटनेच्या सदस्यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी इनाम लावले होते. त्यातून फितुरी झाल्याने भाई कोतवाल आणि हिराजी पाटील हे ब्रिटिशांच्या हाती लागले व जुलुमी ब्रिटिश अधिकारी डीएसपी हॉल यांच्या बंदुकीच्या गोळीने भाई कोतवाल व हिराजी पाटील हे सिद्धगड येथे शहीद झाले. या दोन्ही हुतात्म्यांच्या बलिदानाला येत्या 2 जानेवारी 2026 रोजी 83 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने यावर्षी सुद्धा लहानगा सायकलपटू हिरेन हिसाळके याने सायकलवर भारताचा तिरंगा ध्वज फडकवत खेड( पुणे) ते नेरळ असा 130 किलोमीटर राईड करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी केली.

13 वर्षीय हिरेनने आज 2 जानेवारी रोजी पहाटे 5.00 वाजता पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग येथील शिंदे वाडी येथील वाघजाई माता मंदिर येथे दर्शन घेऊन येथुन सायकलिंगला सुरुवात केली.राष्ट्रीय महामार्गाने पुढे कात्रज वरून कोथरूड बाणेर,वाकड,रावते पुणे,देहू फाटा, सोमाटणे फाटा,वडगाव,कामशेत,कार्ला येथून लोणावळा,खंडाळा,खोपोली,कर्जत वरून कल्याण राज्यमार्गाने नेरळ हुतात्मा चौक येथे अकरा वाजता पोहचत 130 किलोमीटर अंतर सहा तासात पूर्ण केले. यावेळी भारताचा तिरंगा ध्वज आपल्या सायकलवर लावत प्रवास पूर्ण केला. नेरळ येथे हिरेनचे स्वागत करण्यासाठी नेरळकर उपस्थित होते.

Exit mobile version