वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू
। नवी दिल्ली। वृत्तसंस्था ।
महाराष्ट्राची लेक हर्षदा गरुड हीने जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरेल अशी उज्वल आणि लक्षणीय कामगिरी केली आहे. वयाच्या केवळ सतराव्या वर्षी ग्रीसहेरा लिआओन येथे पार पडलेल्या जागतिक जुनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी हर्षदा ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिची ही ऐतिहासिक कामगिरी प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटणारी आहे. शिवाय भावी खेळाडूंना संजीवनी, उर्जा देणारी आहे. हर्षदाच्या या यशावर सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. तसेच तिच्या भावी उत्तमोत्तम भविष्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.