नवरात्रात ऐतिहासिक देखावे आकर्षण ठरले

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।

मुरुड श्रीकृष्ण मंडळ मुरुड जंजिरा कोळीवाडा यांनी इतिहास काळातील लायजी सरपाटील यांचा जंजिरा जिंकण्यासाठी एक आरमारी डाव फसला, मोरोपंतांची सैन्य, दारूगोळा रसद घेऊन जाणारी कुमक किल्ल्यापाशी वेळेवर पोहोचलीच नाही. तरिही छत्रपती शिवाजी महाराजांनी लायजीच्या बहादुरीचा सन्मान करून त्यास पालखीचा मान, छत्री, निशाण व सरपाटील पदवी देऊन सन्मानीत केले. हा देखावा साकारला असल्याने नवरात्रात आकर्षण बनला होता. सदर डेकोरेशन श्रीकृष्ण मंडळ मुरुड जंजिरा कोळीवाडा यांनी केले आहे. संकल्पना गजानन सरपाटील, सजावट संतोष बळी, महेंद्र, उदेश, मिलिंद, सोमनाथ, गणेश, मयूर आणि कार्यकर्ते, मूर्तिकार निलेश साळुंखे हे आहेत. दरम्यान, अशाच पद्धतीने प्रबोधन व्हायला हवे आणि इतिहास पुढे सरकायला हवा असा कोळी बांधवचं मानस आहे. देखावा पाहण्यासाठी 9 दिवस गर्दी झाली.

Exit mobile version