| अलिबाग | वार्ताहर |
शाळेतील विद्यार्थिनीला मारहाण केल्या प्रकरणी आरसीएफ शिक्षिके विरोधात मुलीच्या आजीने तक्रार केली असून या प्रकरणी त्या शिक्षिके विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबात रायगड पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत 2 जुलै 2024 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आर.सी.एफ. स्कुल कुरुळ, ता. अलिबाग येथे अलिबाग तालुक्यातील काळोशी टेप-खंडाळे येथील महिला यांची आठ वर्षीय नात हीस महिला शिक्षिकेने फळयावर लिहिलेले वहीत लिहिण्यास उशिर झाल्याने दोन कानाखाली मारलया. शिवाय पाठीत तीन धपाटे घातले. तिच्या कानाखाली मारल्यामुळे तिच्या डाव्या कानाला दुखापत होवुन ऑपरेशन करावे लागले. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मपोह मीनल मगर या करीत आहेत.