बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश
| किगटाउन | वृत्तसंस्था |
टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करत इतिहास रचला. अफगाणिस्तानने टी 20 विश्वचषकमध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सतत पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला.
अफगाणिस्तान 27 जूनला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्रिनिदाद येथे होणार आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने दमदार गोलंदाजी करत चार बळी घेतले. त्याने फलंदाजीतही महत्वांच योगदान दिले होते. त्याने तीन षटकारांसह 10 चेंडूत 19 धावा करत अफगाणिस्तानला 115 धावांपर्यंत पोहचवले होते. गुरबाजनेही 43 धावांची दमदार खेळी केली. बांगलादेशकडून लिटन दासने शेवटपर्यंत झुंज देत 54 धावा केल्या. अफगाणिस्तानने 20 षटकात 115 धावा केल्या होत्या.
पावसामुळे लक्ष्य 19 षटकात 114 धावांचे आले. अफगाणिस्तानचा सलामीवीर गुरबाजने 55 चेंडूत 43 धावा करत अफगाणिस्तानचा डाव पुढे नेला. मात्र, बांगलादेशच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत अफगाणिस्तानच्या फलंदाजांच्या मुसक्या आवळल्या होत्या. बांगलादेशने अफगाणिस्तानची अवस्था 5 बाद 93 अशी केली होती. बांगलादेशच्या राशिद हुसैनने 3 बळी घेत अफगाणिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले होते. मात्र, राशिद खानने शेवटच्या टप्प्यात 10 चेंडूत 19 धावा केल्या. याच धावा पुढे सामना जिंकताना महत्वाच्या ठरल्या. बांगलादेशने अफगाणिस्तानचे 116 धावांचे आव्हान पार करताना खराब सुरूवात केली. अफगाणी गोलंदाजांनी बांगलादेशची अवस्था 3 षटकात 3 बाद 23 धावा अशी केली. मात्र, लिटन दासने एक बाजू लावून धरली होती. सोम्या सरकार आणि तोहिद ह्रदोय यासोबत महत्वाची भागीदारी रचली. बांगलादेशने सामन्यावर पकड निर्माण केली आहे असं वाटत असतानाच राशिद खानने सौम्या सरकार, सोहिद अन् मोहम्मदुल्लाला देखील बाद करत बांगलादेशची अवस्था 6 बाद 80 धावा केली. सामन्यात सातत पाऊस पडत होता अन् सामना थांबवावा लागत होता. दुसरीकडे लिटन दास अर्धशतक करत अफगाणिस्तानचं टेन्शन वाढवले होते. राशिदने दुसऱ्या राशिदला शुन्यावर बाद करत हे टेन्शन कमी केले . त्यानंतर गुलबदीनने एक बाजू लावून धरलेल्या तनजीमला बाद करत अफगाणिस्तानची सामन्यावरील पकड मजबूत केली. शतक पार पोहचवलेल्या बांगलादेशला शेवटचे दोन धक्के नवीन उल हकने दिले. त्याने टस्किनचा त्रिफळा उडवला तर मुस्तफिजूरला पायचित केले आणि अफगाणिस्तानने इतिहास रचला.