| मुंबई | वृत्तसंस्था |
घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळील पेट्रोलपंपावर मोठं होर्डिंग कोसळ्याची घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे होर्डिंग कोसळले आहे. होर्डिंगखाली 80 वाहने अडकल्याची शक्यता आहे. तसेच, 150 ते 200 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेमध्ये 7 जण जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी धाव घेतली आहे. सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. साडेचारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे होर्डिंग कोसळले. पावसामुळे अनेक जण आपल्या वाहनांसह या पेट्रोल पंपात थांबले होते. होर्डिंग कोसळल्यामुळे पेट्रोल पंपाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, वडाळ्यामध्ये देखील वादळी वाऱ्यामुळे पार्किंग लिफ्ट कोसळली. या पार्किंग लिफ्टखाली अनेक वाहने अडकली असून त्यांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी देखील मदतकार्य सुरू आहे.