। पेझारी । वार्ताहर ।
सद्यःस्थितीत सुशिक्षित बेरोजगारांची वाढलेली संख्या लक्षात घेता विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक होण्यापेक्षा हाताला रोजगार मिळवून देणारे व्यवसायाभिमुख शिक्षण घ्यावे, असे प्रतिपादन को.ए.सो ज्येष्ठ संचालक तथा को.ए.सो. ना.ना. पाटील पोयनाडचे चेअरमन माजी आ. पंडित शेठ पाटील यांनी केले. ते माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 मधील पोयनाड शाळेतील व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात बोलत होते. ज्या शाळेने आणि शाळेतील शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना घडविले, चांगले संस्कार केले त्या शाळेचे व शिक्षकांचे ऋण विसरु नका, असा नैतिकतेचा मोलाचा सल्लाही यावेळी त्यांनी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी प्रथम- स्वरा सूरज म्हात्रे (93.60), द्वितीय- पार्थ भालचंद्र मानकर (90.80), तृतीय- कार्तिकी राहुल पाटील (90.40), चतुर्थ- रिया संजय थळे (86.60), पाचवा- पार्थ नवनाथ पाटील (85.60) या गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान, 12वीतील यशवंत विद्यार्थी शाखा निहाय गुणानुक्रमे विज्ञान शाखा: प्रथम- श्रुती संतोष पाटील (83.67), द्वितीय- शरयू संदेश पाटील (77.50), तृतीय- सिद्धी सुहास पाटील (76.50). कला शाखा : प्रथम- महेश संतोष गडवे (77.67), द्वितीय- साक्षी कैलास पाटील (71.50), तृतीय- रहीम शार्दुल शेख (70.67). वाणिज्य शाखा : प्रथम- अपूर्वा रवींद्र सावंत (72.50), द्वितीय- दीक्षा संदेश पाटील (71.67), तृतीय- मिताली संतोष म्हात्रे (71.17), किर्ती मनोज पाटील (71.17). किमान कौशल्य विभाग : प्रथम- महिमा उमाशंकर भारद्वाज (68.50), द्वितीय- सानिया राजीव खरसंबळे (67.67), तृतीय- राहुल कमलेश जैस्वाल (63.33) या विद्यार्थ्यांचाही सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी रा.जि.प.च्या माजी सदस्या भावना पाटील, कु. राजनंदिनी, मुख्याध्यापक केके फडतरे, सत्रप्रमुख एस. के. पाटील, संध्या खरसंबळे, ज्येष्ठ शिक्षक वशिष्ठ पवार, अविनाश पाटील, उदय पाटील, सायली पाटील, आरती गिरकर, जितेंद्र सोनवणे तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.