विमला तलावातील भगदाड वाढले

। उरण । वार्ताहर ।

उरण नगरपरिषदेच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विमला तलावातील पदपथाला पडलेले भगदाड वाढले आहे. त्यामुळे विरंगुळा म्हणून तलावात येणार्‍या लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व तलावातून ये-जा करणार्‍या शहरातील नागरिकांना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नगरपरिषदेने येथील नागरिकांसाठी विरंगुळा व शहरातील लहानग्यांना खेळण्यासाठी एकमेव ठिकाण विमला तलाव आहे. या विमला तलावातील पदपथावर भले मोठे भगदाड पडले आहे.

तलावाला लागून असलेल्या पदपथाला हे भगदाड पडल्याने हळूहळू पाण्यातील मातीची धस वाढू लागली आहे. त्यामुळे भगदाड मोठं होऊ लागले आहे. या पदपथावरून अनेक नागरिक, विद्यार्थी ये-जा करीत आहेत. तसेच अनेक नागरिक या पदपथावरुन व्यायाम करणार्‍यांची संख्या अधिकची आहे. त्यामुळे सातत्याची वर्दळ असलेल्या या पदपथाची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याची आवश्यकता असतांना नागरपरिषदेचे या भगडाडकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, एखादा अपघात होण्याची श्यक्यता आहे.

नगरपरिषदेकडून डीपीडीसीमधून तलावाच्या दुरुस्तीसाठी 15 लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. हा निधी आल्यानंतर विमला तलावाच्या दुरुस्तीचे काम केले जाईल.

झेड.आर.माने,
अभियंता, उरण नगरपरिषद
Exit mobile version