सुधागडात होळीची धूम

बच्चे कंपनीसह आबाल वृद्धामध्ये उत्साह
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पाली सुधागड सह जिल्ह्यात वर्षोनोवर्षे चालत आलेला होळी हा सण पारंपारिक आणि प्रामाणिक श्रद्धेने आजही साजरा केला जातोय. बच्चे कंपनी सह आबाल वृद्धांचा दांडगा उत्साह पहावयास मिळतोय.आंब्याची किंवा सुरमाडाच्या झाड तोडत होळी तयार करतात. ही होळी जंगलातून तोडल्यानंतर गावकरी , मुले खांद्यावर नाचवत आणतात. कोकणातील होळीचे वैशिष्ट्य, उत्साह, परंपरा जपण्याचे काम कोकणवासी करतात. शिहू बेणसे विभागात देखील वर्षांनूवर्ष हा सण साजरा केला जातो, या सणासाठी मुंबई, ठाणे सह शहरातील चाकरमानी गावी येतात.

पहाटेपर्यंत हा उत्साह असतो. मागच्या वर्षीच्या होळीच्या खुंटात ही होळी उभी केली जाते. व त्याभोवती गवत आणि इतर सजावट केली जाते. या होळी भोवती गावकरी पूजा करत मग जाळला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात. अनेक गावात नारळ, मिठाई, अंडी, कोंबड्या अक्षतांच्या पूर्णत्वाची आहुती अर्पण करतात. यावेळी मोठ मोठ्याने गावकरी बोंब, आरोळ्या ठोकतात. यावेळी बोंब किंवा आरोळ्या ठोकण्याची प्रथाही वेगळ्या आहेत.

अशी पारंपारिक पद्धतीने साजर्‍या होणार्‍या कोकणातील होळीचा उत्साह गावकर्‍यांच्या वर्षभर स्मरणात राहतो. गावाबाहेर राहणार्‍या होळीनिमित्त चार दिवस अगदी आनंदाने जगता येते. कोकणाच्या आंबा, फणस, काजू, पोफळीच्या बागा, अथांगसमुद्र अशी वातावरणात मुंबई कर यांना एक दिवसका होईना शांत जगता येते. या शिमग्याच्यानिमित्ताने धावपळीत थकलेला जीवांना विसावण्याची संधी मिळते.

Exit mobile version