मुंबई-गोवा हायवे वर लांबच लांब रांगा
हायवेवरील खड्यामुळे वाहतूक कोंडी
। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
होळी उत्सव सण साजरा करुन लाखो चाकरमानी आठ दिवसानी रविवार दि.१२ मार्च २०२३ परतीच्या मार्गाला लागले असता. रात्री मध्यरात्री पर्यंत मुंबई-गोवा हायवेवर मोठया लांबच लांब रांगा दिसत होत्या.व या महामार्गाची खड्ड्यांची बिकट अवस्था पाहता वाहतूक कोंडी ही निर्माण झाली होती.
कोकणात होळी सण मोठया उत्सहात साजरा केला जातो.हा होळी उत्सव सण साजरा करण्यासाठी लाखो चाकरमानी कोकणात येत असतात परंतु कोकणात येतांना मुंबई-गोवा हायवेवरील रस्त्याची बिकट अवस्था पाहता या मार्गावर प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरण्याचे काम गेली तेरा वर्षांपासून सुरु या कामात कोणतेही प्रगती नाही. परिस्थिती जैसे थे अशीच असून याचा त्रास कोकणातील चाकरमानी यांना सहन करावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरून लाखो चाकरमानी होळी सणासाठी आठ दिवसापूर्वी मुंबई, ठाणे व इतर शहरातून कोकणात आले होते व रविवारी रंगपंचमीचा कार्यक्रम आटपून सोमवारी कामावर जाण्यासाठी कोकणातील लाखो चाकरमानी लगबगीने परतीच्या प्रवाशाला लागले खरे परंतु या महामार्गाची बिकट परस्थिती पाहता ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.व या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कोकणात विविध पक्षाचे लोकनेते आपआपल्याला मतदान संघात प्रतिनिधित्व करीत आहेत परंतु मधु दंडवते सारखे काम अद्याप कोणी करू शकले याचा परिणाम कोकणातील चाकरमानी यांना गेली तेरा वर्षा पासून भोगावा लागत आहे.अशी खंत आपले नाव न सांगता एका प्रवाश्यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.