• Login
Friday, April 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

नकारात्मकतेची होवो होळी…

Varsha Mehata by Varsha Mehata
March 16, 2022
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
नकारात्मकतेची होवो होळी…
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वैष्णवी कुलकर्णी

दैनंदिन कामं करताना आपल्या हेतूआड येणार्‍यांवर तुफान शेरेबाजी करणं, वाईटसाईट बोलून त्यांना नामोहरम करणं अशा बाबी समाजात नेहमीच सुरू असतात. पण ‘शिमगा’ या शब्दाला चिकटलेली ही सगळी घाण बाजूला सारत होळी सादरी करण्याच्या सुयोग्य पद्धती, त्यामागील कथा आणि या सणाचं प्रयोजन जाणून घेतलं तर त्याचं महत्त्व अधिक नेमकेपणानं समजेल असं वाटतं.

देशभर अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणारा सण म्हणजे होळी. सर्व दुष्ट, अमंगल, नकारात्मक शक्तींचा नाश करुन नव्या वर्षाच्या स्वागताला सज्ज होण्याचा एक सुंदर रिवाज या सणाच्या निमित्तानं पार पडतो. ही परंपरा आजही गावागावातून जपली जाते. शिमगा हे याच सणाचं दुसरं नाव. अर्थात हा सण वर्षातून एक दिवस साजरा होत असला तरी तसं तर ‘शिमगा’ दर दिवशीच साजरा होत असतो! एकमेकांच्या नावानं बोंब ठोकणं, एकमेकांना अद्वातद्वा बोलणं, एकमेकांच्या कुळाचा उद्धार करणं हे होळीच्या निमित्तानं  मनातली, वृत्तीतली नकारात्मकता दूर करण्यासाठी व्यक्त होण्याचे नानाविध मार्ग असले तरी एरवीही होळी नसताना शिमगा साजरा होतच असतो. यात राजकारण्यांचा हात धरणारं कोणी नाही. याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत आणि सध्याही बघत आहोत.
पाच महत्त्वपूर्ण राज्यांमधले निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर देशभर उठणारा धुराळा आणि खेळली जाणारी धुळवड काही वेगळ्याच प्रकारची असणार हे सांगण्याची आवश्यकता नाही. निवडणुकीच्या आधी आणि नंतरही एकमेकांवर दोषारोप करण्याची, चिखलफेक करण्याची कोणतीही संधी सोडली जात नाही. समाजातही दैनंदिन कामं करताना आपल्या हेतूआड येणार्‍यांवर तुफान शेरेबाजी करणं, वाईटसाईट बोलून त्यांना नामोहरम करणं अशा बाबी सुरूच असतात. पण या शब्दाला चिकटलेली ही सगळी घाण बाजूला सारत होळी, शिमगा सादरा करण्याच्या सुयोग्य पद्धती, त्यामागील कथा आणि या सणाचं प्रयोजन जाणून घेतलं तर त्याचं महत्त्व अधिक नेमकेपणानं समजेल असं वाटतं.
दर वर्षी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस राजा होता. तो क्रूर, अन्यायी आणि जुलमी होता. या राजाला प्रल्हाद नावाचा पुत्र होता. हा बीज पोटात अंकुरत असताना प्रल्हादची आई नारदमुनींच्या आश्रमात रहात होती. प्रल्हादचं अंत:करण सुरुवातीपासूनच भगवद्भक्तीने ओथंबलं होतं. तो सतत देवाचा जप करत असे. मुलाचं हे वर्तन राजाला अजिबात रुचलं नाही. पोटच्या मुलाला ठार करण्याचे सगळे प्रयत्न हिरण्यकश्यपूनं करून बघितले. पण प्रत्येक वेळी देवाच्या कृपेनं प्रल्हाद वाचत होता. शेवटी हिरण्यकश्यपूच्या बहिणीनं-होलिकेनं प्रयत्न करायचे ठरवले. तिला अग्नी जाळणार नाही, असं वरदान होतं. त्यामुळे प्रल्हादच्या नाशासाठी ती त्याला मांडीवर घेऊन बसली आणि होळी पेटवली गेली. पण घडलं काय? सद्वृत्तीचा, ईश्‍वरभक्त प्रल्हाद त्यातून सुखरुप बाहेर पडला आणि होलिका मात्र जळून खाक झाली. या अग्नीनं प्रल्हादला योग्य न्याय दिला म्हणून घरोघरी अग्नी पेटवून पूजा करण्यात आली. आता ही पूजा सामुदायिकरित्या केली जाते. होळीला संध्याकाळी नैवेद्य दाखवला जातो, तिला प्रदक्षिणा घातल्या जातात. होलिका जळून खाक झाल्यामुळे आनंदित झालेल्या प्रजेनं गुलाल आणि रंग उधळून रंगोत्सव साजरा केला. एकत्र नाचून, गाणी म्हणून मनातल्या भावना व्यक्त केल्या आणि रंगपंचमी किंवा धुळवडीची प्रथा सुरू झाली. ती आजही मनोभावे पाळली जाते.
आपला प्रत्येक सण प्रतिकात्मक आहे. साहजिकच स्थूल रुपानं कृती करायची आणि त्यातून मिळणारा संदेश अंगी बाणवायचा असतो. होळीची पूजा म्हणजे दुष्प्रवृत्तींचं दहन आणि सद्प्रवृत्तींचं पूजन असतं. आपल्या मनात असलेले दुष्ट विचार, द्वेष, मत्सर, अज्ञान, अंधविश्‍वास, एकमेकांबद्दलची कटुता या सार्‍यांचं दहन होळीमध्ये करायचं असतं आणि मनाची शुद्धी करायची असते. नंतर या शुद्ध मनानं गुलाल उधळून रंगोत्सव साजरा करावा अशी अपेक्षा असते. रंगोत्सवाच्या दिवशी संस्कृतीने आपल्याला मुक्तपणे वागण्याची मुभा दिली आहे. या दिवशी माणसा-माणसातल्या दुराव्याच्या भिंती अलगद गळून पडतात. एरवी फक्त स्मितहास्यापलीकडे न सरकणारा संवाद रंग लावल्यावर शब्दांपलीकडचा होऊन जातो. गुलालाच्या फक्त एका बोटानं समज-गैरसमज, मान-अपमान क्षणात पुसले जातात आणि त्या रंगासारखा आनंद क्षणभर रेंगाळत राहतो. या दिवशी सारे उमाळे, उसासे बाजूला ठेवून एकमेकांना रंग लावला जातो. त्यात थट्टा असते, प्रेम असतं, हक्क असतो आणि लटकं भांडणही असतं. ही सैलावलेली नाती अनुभवताना खूप मोकळं मोकळं वाटतं. एका दिवसातले हे चाकोरीबाहेरचे क्षण ताजंतवानं होण्यासाठी फार मौल्यवान असतात. मोकळेपणी हसणं, दुसर्‍याला चिडवणं, मुक्तपणे व्यक्त होणं हे किती गरजेचं आहे हे या दिवशी लक्षात येतं. मग हा आनंद दुसर्‍या होळीपर्यंत हृदयात जपला जातो.
होळी, धुळवड, रंगपंचमी हे सण आनंदाचा कुंभ घेऊन येतात. महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करायचा झाला तर होळीच्या  दिवशी पुरोहित बोलावून होलिका पूजन केलं जातं. ही होळी म्हणजे देवी आहे. तिच्या पूजनाने जीवनातले अनिष्ट प्रसंग टळतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या पेटत्या होळीला नारळ अर्पण केला जातो आणि नंतर तो काढल्यावर उपस्थितांना प्रसाद म्हणून वाटला जातो. महिला होळीसाठी केलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात, त्यानंतर पाण्याची धार धरुन होळीभोवती प्रदक्षिणा घातली जाते. काही कर्मठ लोक गुळाचे साप, विंचू, झुरळ, ढेकूण बनवून होळीच्या आगीत जाळतात. हे सगळं सुरू असताना जमलेले पुरुष बोंब मारत राहतात. इंग्रजी राजवटीत त्यांच्या अन्याय्य शासनपद्धतीचा निषेध म्हणून एक बोंब ठोकली जायची. ‘होळी म्हण होळी, पुरणाची पोळी… इंग्रज मेला संध्याकाळी…’ अशा काही टवाळखोर घोषणा होळीभोवती दिल्या जात असल्याची आठवण वृद्धांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळते.
जैमिनीच्या पूर्वमीमांसा सूत्रात होळी या सणाचा उल्लेख ‘होलाका’ म्हणून केला आहे. हा सण भारताच्या पूर्व भागात अतिशय लोकप्रिय होता. तो साजरा करण्याचे विविध प्रकार जैमिनीसूत्र, काठक गृह्यसूत्र, लिंग पुराण, हेमाद्रिचं व्रत खंड, वराहपुराणात सांगितले आहेत. या ग्रंथांमध्ये या सणासंबंधीचे अनेक प्राचीन संदर्भ आणि सण साजरा करण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत. काठक गृह्यसूत्रामध्ये ‘राकाहोलाके’ नावाचं सूत्र आहे. टीकाकारांनी याचा अर्थ लावताना होलाके हा स्त्रीच्या सौभाग्य वर्धनासाठी करावयाचा एक विधी असल्याचं सांगितलं आहे. त्यात राका म्हणजे पौर्णिमा ही देवता असते. म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी केल्या जाणार्‍या या विधीने स्त्रीचं सौभाग्य वाढतं असं यात सांगितलं आहे.
वात्स्यायनाने कामसूत्रात स्त्री-पुरुषांच्या क्रीडाप्रकारात वीस खेळ सांगितले आहेत. त्यावेळी हे खेळ कमी-अधिक प्रमाणात विविध प्रातांमध्ये खेळत असतं. त्यात ‘होलाका’ हा एक खेळ सांगितला आहे. यात जनावरांच्या शिगांमधून, बांबू वा तत्सम साधनांमधून एकमेकांवर रंग उडवला जात असे. यावेळी पाण्याचाही वापर होत असे. हेमाद्रीने बृहद्यमाच्या ग्रंथात होळी पौर्णिमेला ‘फाल्गिनिका’ म्हटलं आहे. तो दिवस बालीश चेष्टा करुन, बालीशपणा करुन साजरा केल्यास संसार सुखाचा होतो असं सांगितलं आहे. यामुळे लोकांची भरभराट होते, असंही हा ग्रंथ सांगतो. वराहपुराणात या पौर्णिमेला ‘पटवासविलासिनी’ म्हटलं आहे. या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंगीत पुड्या उधळून दिवस साजरा करावा असं या पुराणात सांगितलं आहे. भविष्योत्तर पुराणात कृष्ण-युधिष्ठीर संवादात रघुराजाची एक कथा सांगितली आहे. त्याच्या राज्यात ‘ढुंढा’ नावाची एक राक्षसीण मुलांना रात्रंदिवस पीडत असे. देव वा मनुष्य यांच्यापासून तुला मरण येणार नाही, असा वर तिला ब्रह्मदेवाने दिलेला असतो. तिच्या पीडेच्या निवारणार्थ पुरोहिताच्या सल्ल्याने राजाने फाल्गुनी पौर्णिमेला घराबाहेर लाकडाचा ढीग करुन रात्रभर पेटता ठेवावा, अश्‍लील शब्द उच्चारुन मोठा ध्वनी करावा अशी आज्ञा दिली. आणि खरंचच त्यायोगे राक्षसी मरण पावली. तेव्हापासून तो दिवस ‘अडाडा’ किंवा ‘होलिका’ या नावाने प्रसिद्ध आहे. वद्य प्रतिपदेला होळीच्या राखाडीला वंदन करुन, तिथे पाणी तापवून, अंगाला राख फासून स्नान करावं असं सांगितलं आहे. होळी म्हणजे हिवाळ्याचा शेवट आणि उन्हाळ्याची सुरूवात. या दिवसात वसंताचं साम्राज्य पसरलेलं असतं. म्हणून या दिवशी चंदन आणि आम्रमोहोर यांच्या साह्याने कामदेवाची पूजा करण्याविषयीदेखील सांगितलं आहे. ही पूजा आयुष्यभर सुख प्रदान करते. जैमिनी आणि काठक गृह्यसूत्रातल्या संदर्भावरुन हा सण ख्रिस्तपूर्व काळात काही शतकं अस्तित्वात आणि लोक अनुभूतीत असावा असं दिसून येतं. वसंताच्या आगमनाचं स्वागत कामोद्दिपक नृत्य-गीत गायनानं करावा असं यात म्हटलं आहे. भविष्योत्तर पुराण आणि कामसूत्रातही हा सूर आळवला गेलेला दिसतो. विविध प्रांतात होलिकोत्सव परंपरेप्रमाणे एक, तीन वा पाच दिवस साजरा केला जातो. शूलपाणीलिखित ‘दोला यात्रा विवेक’ या ग्रंथात या सणाचं विधीविधान सांगितलं आहे.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

रोह्यामध्ये लोक अदालतीमध्ये दहा खटले निकाली

Next Post

मराई पुलावरील अतिक्रमणे जमीनदोस्त

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
मराई पुलावरील अतिक्रमणे जमीनदोस्त

मराई पुलावरील अतिक्रमणे जमीनदोस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?