घरफोड्या करणारे अट्टल आरोपी गजाआड

| कर्जत | वार्ताहर |
कर्जत शहरातील मुद्रे बुद्रुक गावातील एका बंद घराचे कडी-कुलूप तोडून चोरट्याने घरफोडी करून घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल मिळून 1 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेलेला होता. याप्रकरणी आरोपी शफीक अब्दुल शेख (40) रा. घुंगट नगर, भिवंडी, जिल्हा ठाणे यास भिवंडी, तर त्याचा साथीदार मित्र लवकुश पापाजी गुप्ता (31) न्यू बालाजी नगर, अंबरनाथ याठिकाणावरुन ताब्यात घेतले आहे. दि. 13 ऑक्टोबर रोजी मुद्रे बुद्रुक गावातील महसूल वसाहतीत राहणारे रंजित धोंडिबा चव्हाण हे आपल्या कुटुंबियांसह घर बंद करून बाहेर गेले असता त्यांच्या घराचे कडी- कुलूप तोडून एका चोरट्याने घरात प्रवेश करून बेडरूमच्या कपाटातील सोन्याचे दागिने व चार्जिंगसाठी लावलेला मोबाईल चोरून नेलेला होता. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

Exit mobile version