चेंढरे भंडारआळी येथे नवरात्रीनिमित्त होमहवन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नवरात्रोत्सवानिमित्त अलिबाग शहरातील भंडारआळी येथे कानिफनाथ मठ येथे नवव्या दिवशी होमहवन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे अमेरिकेपासून बडोदा, मुंबई, पुणे, नालासोपारा पर्यंतच्या भाविकांनी यात सहभाग घेतला होता.

गेले सात पिढयांपासून सुरु असलेल्या या उत्सवाला शहरातील तसेच परिसरासह जिल्हाभरातून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. कानिफनाथांचे स्थान असलेला हा मठ म्हणजे मोरे कुटूंबियाचे कुलदैवत आहे. चंद्रकांत महादेव मोरे आणि स्वप्नाली मोरे पुजारी म्हणून 12 वर्षांपासून सेवा करीत आहेत. नवरात्रीनिमीत्त पहिल्या दिवसांपासून दसर्‍यापर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यात हरिनाम, जागर असा विविध कार्यक्रमांचा भरना असतो. येथे गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो. विशेष म्हणजे गोपाळकृष्णाची पाचवीचा समारंभ देखील येथे पार पडला जातो.

देव दिवाळी दिवशी देखील मोठा उत्सव आयोजित करण्यात येत असल्याची माहिती संतोष मोरे यांनी दिली.कित्येक वर्षांची परंपरेनुसार मंगळवारी नवमीनिमीत्त होम आयोजित करण्यात आला होता. या मान नरेश नारायण मोरे आणि प्रफुल्ल मोरे या दाम्पत्याला देण्यात आला होता. या उत्सवासाठी अमेरिकास्थित परिमल प्रभाकर मोरे यांनी तसेच दादर येथून दर्शन मोरे यांनी देखील सहकार्य केले.

Exit mobile version