| खारेपाट | वार्ताहर |
आवास येथे दि.6 ते 9 जानेवारी 2023 रोजी होणार्या भव्य क्षात्रैक्य कृषक महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सदर भव्य कृषीमेळाव्यासाठी ठिकाण स्व.प्रभाकर राणे नगरी बा.ना.हायस्कूल आवास येथे सकाळी 10 ते 10 वाजेपर्यंत अलिबाग तालुक्यास रायगड जिल्ह्यातील शेती व बागायती शेतकरी वर्ग व सर्व स्थरातील जनतेला लाभ घेता येईल. महत्त्वाचे म्हणजे शेतकर्यांच्या शेतकर्यांसाठी शेतकर्यांनी आयोजित केलेल्या कृषक महोत्सवात सर्व स्थरातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा अशी माहिती आवास ग्रामपंचायत सरपंच अभिजित राणे यांनी व्यक्त केलं.
पुढे म्हणाले की सदर कृषक मेळाव्यात शेतकर्यांना कृषीविषयी तज्ञाने मार्गदर्शन मिळेल तसेच या भव्य कृषी मेळाव्यात विशेष आकर्षण म्हणजे स्थानिक पातळीवरील शेती उत्पादन प्रदर्शन आणि विक्री तसेच बैल,म्हैस,घोडे,शेळ्या जातिवंत पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन व विक्री त्याचप्रमाणे बैलगाडी आणि घोडागाडी स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर होतील तसेच राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, कुस्ती स्पर्धा व शरीर सौष्ठव स्पर्धा अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यांचा सर्वांनी लाभ घ्यावा . सरपंच अभिजित राणे यांनी व्यक्त केलं.