। महाड । जुनेद तांबोळी ।
राज्यासह जिल्ह्यातील सागरी मार्गाची ग्रस्त वाढवणार असून अत्याधुनिक साधने निर्माण करू अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांनी महाड येथील नवीन पोलीस वसाहतिच्या ऑनलाइन उद्घाटन प्रसंगी दिली. रायगड जिल्यातील पोलीसांनी अनेक गुन्ह्यांची उकल करत चांगली कामगिरी केली असून कोव्हिड काळात आपल्या कुटुंबाचे रक्षण करत पूरपरिस्थिती मध्ये सर्व सामान्यांच्या मदतीला जात पोलीसांनी आपली सेवा बजावली. या कार्याची दखल घेत पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी पोलिसांचे कौतुक केले. यावेळी स्थानिक आ.भरत गोगावले महाडमध्ये असणार्या इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले.
महाडमधील नवेनगर परिसरातील नवी पोलीस वसाहतीचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ई-पद्धतीने पार पाडण्यात आला. त्यावेळेस उपस्थित गृहमंत्री शंभुराजे देसाई, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, पोलीस कोकण पोलीस परिक्षेत्राचे संजय मोहीते, रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्ह्याधिकारी महेंद्र कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते.