। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आदर्श नागरी पतसंस्था मर्यादित अलिबागने आपले आर्थिक व्यवहार आणखी जलदगतीने व्हावे तसेच ग्राहकांना आदर्श पतसंस्थेच्या माध्यमातून थेट क्यु आर कोड च्या माध्यमातून बिल देता यावे यासाठी क्यु आर कोड सुविधा सुरु केली आहे. या क्यु आर कोड सुविधेचा शुभारंभ अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष सतिश प्रधान, सचिव कैलास जगे आदी उपस्थित होते.
आर्थिक व्यवहार तसेच बिल पेमेंट करण्यासाठी आता ग्राहक विविध अॅपच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करण्यासाठी भर देत असतात. फोन पे, गुगल पे, पेटीएम यासारख्या अॅपच्या माध्यमातून असे व्यवहार केले जातात. मात्र पतसंस्थेच्या माध्यमातून असे व्यवहार होत नसल्याने आतापर्यंत पतसंस्थेच्या सेव्हींग खात्याचा वापर देखील ठराविक व्यवहारापर्यंत मर्यादित होता. मात्र याला छेद देत अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आपल्या संकल्पनेतून मोठी झेप घेत प्रथमच आदर्श नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून क्यु आर कोड सुविधा सुरु करुन आदर्श पतसंस्थेच्या खातेदारांसाठी थेट कोड स्कॅन करुन व्यवहार करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. पतसंस्थेच्या प्रशांत नाईक यांनी या सुविधेचेचे उद्घाटन केले.
नुकताच 23 वा वर्धापन दिन साजरा करणार्या आदर्श पतसंस्था विविध सामाजिक उपक्रम राबवून आपले सामाजिक दायित्व देखील पुर्ण करत असते. कोरोना प्रतिबंधक लसीचे एक डोस घेतलेल्या तसेच दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी आकर्षक व्याजदर देऊन जास्तीत जास्त डोस घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्याचा कौतुकास्पद उपक्रम देखील आदर्श नागरि पतसंस्थेने राबविला. क्यु आर कोड प्रकाशन समारंभात या सुविधेबद्दल आदर्शचे संचालक अभिजीत पाटील यांनी माहिती दिली.
यावेळी क्यु आर कोडचे स्टिकर सुरुची रेस्टॉरंटचे रोहन चिमणे, सुरुची आइस्क्रीम पार्लरचे अरुण जैस्वाल, विनी एंटरप्राइजेस संतोष ल्हासे, प्रिन्स डिझायनर स्टुडिओ कैलासकुवर राठोड यांना नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह उपाध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कैलास जगे, संचालक विजय पटेल, अनंत म्हात्रे, विलाप सरतांडेल, जगदीश पाटील, अभिजीत पाटील , वर्षा शेठ, तज्ञ संचालक सुरेश गावंड, कार्यलक्षी संचालिका मीनाक्षी पाटील
संचालक, कर्मचारी तसेच सभासद प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन द्वारा उपस्थित होते. सुत्रसंचलन व्यवस्थापक उमेश पाटील यांनी केले.